राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले या स्त्री शक्तीचे प्रतिक : आ.संग्राम जगताप

 
 राष्ट्रवादीच्या वतीने राजमाता जिजाऊंचे माहेर सिंदखेड ते सावित्रीबाई फुले यांचे माहेर नायगाव 
रथ व मशाल यात्रेचे शहरात स्वागत
 
नगर  : महिला दिना निमित्त राजमाता जिजाऊंचे माहेर सिंदखेड ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे माहेर नायगाव दरम्यान स्त्री शक्तीचा जागर करीत काढण्यात आलेल्या रथ व मशाल यात्रेचे राष्ट्रवादीच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांनी शहरात स्वागत केले. तसेच माळीवाडा येथे देखील या रथाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. 
 
या रथ यात्रेचे प्रमुख सावित्रीबाई फुले यांचे वंशज अरविंद नेवसे यांचा आमदार जगताप यांनी सत्कार केला. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, बाबासाहेब गाडळकर, दिपक खेडकर, सचिन गुलदगड, शरद झोडगे, बाबासाहेब जाधव, बाळासाहेब जाधव, निखील शेलार, भरत गारुडकर, प्रशांत ढलपे, सागर सोबळे, ऋषी ताठे, सुनिल शिंदे, आशिष भगत, बजरंग भुतारे, बाबा पटवेकर, दत्ता जाधव, आशिष भगत, गणेश नन्नवरे, नितीन डागवाले, अशोक कानडे, गणेश धाडगे आदि उपस्थित होते.  

आमदार संग्राम जगताप म्हणाले की, राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले या स्त्री शक्तीचे प्रतिक आहे. राजमाता जिजाऊंच्या प्रेरणेने स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवण्यात आली. तर सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मशाल प्रज्वलीत करुन समाजातील अंधकार नष्ट केला. आजच्या महिलांसाठी या महान व्यक्तींचे कार्य व विचार दिशादर्शक असून, या यात्रेच्या माध्यमातून पुन्हा त्यांच्या कार्याला उजाळा मिळून खर्‍या अर्थाने स्त्री शक्तीचा जागार होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

Post a Comment

Previous Post Next Post