शेतक-यांनी उन्‍हाळा हंगाम पाण्‍यासाठी 17 मार्चपर्यत अर्ज करावे

 

नगर : पाटबंधारे विभागाचे कार्यक्षेत्रात येणा-या घाटशिळ पारगाव प्रकल्‍पावरील लाभधारक शेतक-यांकडून उन्‍हाळा हंगाम सन 2019-20 वर्षासाठी पाणी पुरवठा करण्‍यासाठी 17 मार्च 2020 पर्यत पाणी अर्ज मागविण्‍यात येत आहेत .

घाटशिळ पारगाव मध्‍यम प्रकल्‍पामध्‍ये दि. 2 मार्च 2020 रोजी उपलब्‍ध असलेले पाणी साठयातून पिण्‍यासाठी दिनांक 31 जुलै 2020 पर्यत पुरेल इतका पाणीसाठा आरक्षित करुन जो पाणीसाठा शिल्‍लक राहील त्‍या शिल्‍लक साठयामधून उन्‍हाळा हंगाम ( दि. 1 मार्च 2020 ते दि. 30 जून 2020 ) मध्‍ये उभा ऊस, अन्‍नधान्‍य चारा पिके, मागास गहू  इतर उन्‍हाळा हंगामी भुसार उभ्‍या पिकास  नमुना 7 चे पाणी अर्जावर अटी व शर्तीस  अधीन राहुन घाटशिळ पारगाव प्रकल्‍पावरील  उपसा सिंचन मंजूरीधारकास  पाणी   देण्‍याचे नियोजित असून त्‍याप्रमाणे शासन व वरिष्‍ठ कार्यालयाचा जो निर्णय होईल  त्‍याप्रमाणे  पाणी पुरवठा करण्‍यात येणार आहे.

इच्‍छूक लाभधारकांनी  उन्‍हाळा हंगामासाठीचे  पाणी अर्ज (  उपसासाठी नं 7 अ सुधारीत) संबंधीत शाखा कार्यालयात दिनांक 17 मार्च  2020  रोजी सायं 5  वाजेपर्यत  दाखल करण्‍यात यावीत. उशीरा आलेल्‍या पाणी अर्जाचा विचार केला जाणार नाही. तसेच मर्यादित पाणी साठयामुळे खातेदारास मागणीप्रमाणे पाणीपुरवठा करता न आल्‍यास  व त्‍यामुळे  त्‍यांचे पिकांचे काहीएक नुकसान झाल्‍यास  जलसंपदा खाते जबाबदार राहणार नाही. आलेल्‍या मागणीस शिल्‍लक राहत असलेल्‍या पाण्‍याचे मर्यादेपर्यत पूर्णतः अगर अंशतः मंजूरी देण्‍याचा अधिकार जलसंपदा विभागाकडे राखून ठेवलेला असे  पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी एका प्रसिध्‍दी पत्रकान्‍वये  कळविले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post