नगर पोलिसांना कोटपा कायद्याचे खास प्रशिक्षण
नगर : कोठेही सर्रास होणारे धूम्रपान तसेच तरुणांमधील वाढत्या व्यसनाचे दुष्पपरिणाम लक्षात घेता नगर जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगर पोलिसांनी कोटपा कायद्यानुसार विशेष कारवाई मोहीम हाती घेतली. त्याअंतर्गत सार्वजनिक धूम्रपान आणि शाळा- कॉलेजजवळ तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री करणार्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईचे नगरकरांकडून कौतुक केले जात आहे.
सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करून कायद्याचे उल्लघंन करणार्यांवर सिगारेट- तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रतिबंध कायदा (कोटपा) अंतर्गत कडक कारवाई करण्यात येते. त्याचे खास प्रशिक्षण शुक्रवारी पोलीस मुख्यालयात पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या नेतृत्वाखाली उप विभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली संबंध हेल्थ फाऊंडेशनचे राज्य व्यवस्थापक देविदास शिंदे यांनी दिले. यावेळी कोटपा कायद्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. नगरमधील मॅक्सकेअर रुग्णालयाचे कर्करोगतज्ञ् डॉ.सतीश सोनवणे यांनी तंबाखूमुळे होणार्या आजाराबत आणि त्याच्या परिणामांबाबत पोलिसाना मार्गदर्शन केले.
त्यानंतर नगर शहर पोलिसांनी कोटपा कायदा कारवाई मोहीम घेण्यात घेतली. बस स्थानकाबाहेर सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे, शाळा- महाविद्यालय परिसरात लहान मुलांना सिगारेट- तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणे, कोटपा कायद्यानुसार आवश्यक सूचना फलकांची पूर्तता न करणे, अवैध तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणे अशा लोकांवर कोटपा कायदा कलम 4 आणि कलम 6(अ),(ब) नुसार ही कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई अशीच पुढे चालू राहणार असून विशेषतः शाळा- महाविद्यालय परिसरातील कारवाईचे स्थानिक नागरिकांकडून कौतूक केले जात आहे.
नगर पोलिसांनी आपले शहर तंबाखूमुक्त करण्यासाठी जे पाऊल उचले आहे, त्याचे मी स्वागत करतो. कोणत्याही प्रकारातील तंबाखूचे व्यसन प्रत्येकाच्या आरोग्यास घातकच असते. महाराष्ट्रात वर्षाला 72 हजार लोक तंबाखूचे बळी ठरतात. ही बाब खूपच चिंताजनक आहे. तंबाखू पासून आपल्या पिढीला, मुलांना दूर ठेवल्यास हा आकडा आपण कमी करू शकतो. तंबाखू विरोधी कोटपा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केल्यास हा आकडा टाळणे शक्य असल्याचे व्हाईस ऑफ टोबॅको व्हिक्टिम अभियनाचे संरक्षक तसेच कर्करोग तज्ञ डॉ. सतीश सोनवणे यांनी सांगितले.
लहान मुले आणि तरुण हे आपल्या राष्ट्राची संपती आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारे तंबाखू व्यसनापासून दूर ठेवणे गरजेचे आहे. तंबाखू विरोधी कोटपा कायद्याच्या नियमित कारवायांचा चांगला परिणाम दिसून येतो. केरळ आणि कर्नाटक राज्यात शिक्षण विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवायांमुळे तांबाखुच्या वापरकर्त्यांमध्ये घट आल्याचे दिसून येते असे केअरिंग फ्रेंड्सचे निमेश सुमती सांगतात.
कोटपा-2003 कायदा म्हणजे काय?
सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंध कायदा अधिनियम 2003 हा केंद्र सरकरचा कायदा आहे. या कायद्यात एकूण पाच प्रमुख कलमे आहेत. त्यापैकी कलम-4 नुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे गुन्हा आहे. तर कलम- 6 ( ब ) नुसार कोणत्याही शैक्षणिक संन्स्थेच्या 100 यार्ड आवारात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर प्रतिबंध आहे. बालकांना किव्हा बालकांकडून तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर प्रतिबंध आहेत. या कायदयानुसार 200 रुपये चलन पावती दंड किव्हा बाल न्याय कायदा 2015 नुसार 1 लाख रुपये आणि 7 वर्षाची शिक्षची तरतूद करण्यात आली आहे. बाल न्याय कायदा कलम 77 नुसार कारवाई करणारे महाराष्ट्र हे पाहिले राज्य आहे.
Tags:
Maharashtra

