हर,हर महादेव म्हणत अनेकांनी घेतले दर्शन


हर, हर  महादेव म्हणत अनेकांनी घेतले दर्शन

शिवमंदीरे दुमदुमली । वृद्धेश्‍व,  डोंगरगणला भाविकांची गर्दी

नगर (दि.21) : महाशिवरात्रीच्या पर्वावर शहरातील शिवमंदीरे शिवभक्तांचा जनसागर उसळला होता. हर हर महादेव.. बम बम भोले च्या जयघोषाने शिवालये दुमदुमून गेली. शिवभक्तांनी विविध कार्यक्रमांतून आराधना केली. महादेवाचे गुणगान करीत पहाटेपासूनच शिवभक्तांच्या उत्साहाला उधाण आले होते. शुक्रवारी जिल्हाभरात महाशिवरात्री साजरी करण्यात आली. त्यानिमित्त शहरातील महादेवाची देवालये दोन दिवस आधीपासूनच सजायला लागली होती. विविध ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

 

पहाटे 5 वाजतापासून विविध मंदिरामध्ये भाविकांची गर्दी दिसून आली. हर,हर, महादेव व जय भोले शंकराचे गुणगाण गात हजारो भाविक महादेवाची आराधनेत मग्न झालेे होते.  महादेवासाठी विविध प्रकारचे फुल, बेल पाने व दुग्धजन्य पदार्थ वाहत शिवभक्तांनी महाशिवरात्री साजरी केली. माळीवाडा येथील कपिलेश्‍वर मंदिर, तोफखाना येथील सिध्देश्‍वर मंदिर, दिल्लीगेट येथील शिवमंदीर, भिंगारजवळील बेल्हेश्‍वर आदी विविध शिवालयांमध्ये शिवभक्तांचा जनसागर उसळला होता.वृद्धेश्‍वर व डोंगरगण येथे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मंदिरात महाशिवरात्रीच्या पर्वावर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यंदाही शिवभक्तांनी पहाटे प्रथम महादेवाचा दुग्धाभिषेक केला.


पैठण येथून कावड्यांद्वारे आणलेल्या पाण्याने विविध मंदिरांमध्ये अभिषेक करण्यात आला. वृद्धेश्‍वर मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची गर्दी जमली होती. मंदिर व्यवस्थापनाकडून मंदिराभोवती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याने महादेवाचे आकर्षक रुप पाहाण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळपासूनच भक्तांची रीघ लागली होती. शिवाच्या गाभार्‍यात जावून दर्शन घेण्यासाठी दुरदुरवरुन शिवभक्त आले होते. मंदिर व्यवस्थापनाकडून शिवभक्तांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली.वृद्धेश्‍वरला जाण्यासाठी एसटी महामंडळाने विशेष गाड्यांची व्यवस्था केली होती.

Post a Comment

Previous Post Next Post