

डॉ.दिलीप देशमुख - राजामाता, राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी सिंदखेड राजा येथे झाला. जिजाऊंने या देशात हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी आपले सुपुत्र छत्रपती शिवरायांना घडविले. जगात एका इतिहासाची निर्मिती केली. जिजाऊ ही केवळ शिवबांचीच आई नव्हती तर जगतमाता होती. राजामाता, राष्ट्रमाता या नावांनी ओळखल्या जाणार्या जिजाऊंचे या देशात साधे स्मारक नसावे, याची प्रत्येक भारतीयाला खंत असली पाहिजे.
राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्माचे वेळी 45,000 लोकवस्ती असलेल्या सिंदखेडराजा या शहरात त्या काळातील लखुजीराजांचा राजवाडा, रंगमहाल, सावकार वाडा, कालकोट, लखुजी राजांची समाधी, पुतळा, बारव, सजना बारव, गंगासागर, काळसमुद्र या नावाच्या विहिरी, चांदणी तलाव, मोतीतलाव हे ऐतिहासिक जलसाठे या बघण्याजोग्या वास्तु आहेत. ह्यापैकी मोतीतलावाचे बाजुचे पारावर - ‘जिजाऊ सृष्टी‘ ची जागा निवडण्यात आली आहे. मोतीतलाव हा शिवकालीन विदर्भातील जलयांत्रिकीचा एक उत्कृष्ट नमुना आहे. अशा या प्रसिध्द ऐतिहासिक तंत्रज्ञानयुक्त वास्तुच्या भोवती ‘जिजाऊ सृष्टी’ निर्माण होणे, हा एक शिवसंकेत आहे. व या भुमिवर आधुनिक युगातील नव्या वास्तु उभ्या होत आहेत. जिजाऊंचे जन्मस्थळ म्हणून सिंदखेड राजा हे गाव या देशाचे सर्वश्रेष्ठ तीर्थक्षेत्र व ज्ञानक्षेत्र व्हावे, अशी धारणा आहे.
मराठा सेवा संघाने सिंदखेड राजा येथे नवीन नागापूर - मुंबई एक्सप्रेस हायवेवर स्वतःच्या जागेत जिजाऊ धर्मपीठ व जिजाऊ मंदिर अशा सामुहिक ‘जिजाऊसृष्टी‘ चे निर्माण कार्याची सुरुवात केली आहे. राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ ह्या केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई एवढेच त्यांचे कार्य मर्यादित नाही.
हिंदवी स्वराज्याची संकल्पना, हिंदवी स्वराज्याची निर्मिती, आदर्श कन्या, आदर्श माता, जगातील सर्वश्रेष्ठ म्हणजे जिजामाता. राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ जन्मस्थान सिंदखेड राजा येथील मातृतीर्थावर जवळपास 450 एकर जागेवर 11,000 कोटी रुपयांच्या प्रस्तावित खर्चाचे एक भव्य स्वप्न मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष, सन्माननीय पुरुषोत्तम खेडेकर ह्यांनी पाहिले, त्याचे नाव जिजाऊ सृष्टी सिंदखेड राजा हे मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील शिवसंस्कृतीचे आदिपीठ आहे. मध्ययुगीन कालखंडामध्ये राजमाता जिजाऊंचे कर्तृत्वामुळे अवघी शिवसंस्कृती एकसुत्रात बध्द झाली होती. स्वाभाविकच शिवसंस्कृतीच्या या आर्वाचित उगमस्थानाला एक आगळे ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. सोहळ्यासाठी जमलेल्या जवळपास 5 लक्ष शिवधर्मीयांनी ह्या स्फुर्ती स्थानाचे दर्शन घेतले आहे व बौध्दिक स्वातंत्र्याची अनुभूती घेत आहेत. या पठारावर आज आपली ही ‘जिजाऊ सृष्टी’व शिवधर्मपीठ ह्या स्वरुपात बघत आहोत, हे पठार, ज्या पठारावर राजमाता जिजाऊ घोड्यावरुन फेरफटका मारायच्या.
ज्या ठिकाणी युध्दकलेचे, राजकारणाचे शिक्षण घेत होत्या, त्याच स्थळावर आज तुम्ही आम्ही संकल्पना केलली जिजाऊ सृष्टी हा जिजाऊ सृष्टीचा प्रकल्प देशाच्या स्वाभिमानाच्या राष्ट्रीय प्रकल्प व्हावा व हे जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र व्हावे, असा सर्वोच्य विचार ह्यामागे आहे. त्यानुसार ‘जिजाऊ सृष्टी’ असा सर्वांचा विचार हयामागे आहे. त्यानुसार जिजाऊ सृष्टी हा विविध विषयांना सामावून घेणारा एकत्रित स्वरुपाचा प्रकल्प व्हावा व ते अद्यावत तीर्थक्षेत्र व ज्ञानक्षेत्र व्हावे, ही संकल्पना आहे. जिजाऊ संग्रहालय, जिजाऊ ग्रंथालय, महिला रोजगार केंद्र, महिला मिलिटरी अकॅडमी,सिंधु संशोधन संस्था, महिला विद्यापीठ अशा संस्थांची निर्मिती व्हावी, अशी योजना आहे.
ह्यात जागतीक सर्वार्थाने ध्यानमंदिर, संशोधन विभाग, प्रार्थनास्थळांची रचना करणे, विज्ञाननिष्ठ परंपरा वृध्दीगत करणारे मेळावे भरवणे, विश्वशांती व एकसंघतेसाठी विविध चर्चासत्रांचे आयोजन, विविध विषयांचे प्रशिक्षण चळीीळेप जश्रूाळळिल,उरवीश उरािी, उेाारपवे ऋेीलश ढीरळपळपस उशपीींश यासारख्या विविध योजना, सर्व बहुजन समाज विज्ञाननिष्ठ, कर्मनिष्ठ, कर्तव्यनिष्ठ बनवून संपूर्ण विश्वामध्ये मानवा - मानवामध्ये समता, समानता, बंधुत्वाची आचारसरणी व विचारसरणी मांडणारा प्रकल्प तयार व्हावा, अशी मांडणी व आखणी करणे, हा - जिजाऊ सृष्टी चा मुख्य - उद्देश आहे. याशिवाय भारत देशाचा सुमारे 10,000 वर्षाचा सत्य सांस्कृतिक इतिहास, जिजाऊ काळातील देशातील सर्व क्षेत्रातील स्थिती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील महत्त्वाचे प्रसंग ते आजपर्यंतची देशाची वाटचाल, बहुजन समाजातील सर्व समाज सुधारक, संतांची शिकवण, चित्ररुपाने, इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या सहाय्याने लिखीत स्वरुपात विविध प्रकारे चित्रीत केल्या जातील. परंतू ही संकल्पना व या सर्व योजना, ही सर्व इच्छा आकांक्षा ही सर्व मांडणी व आखणी फक्त दोनच मुख्य बाबींवर अवलंबून आहे. व या बाबी म्हणजे अर्थबळ आणि मनुष्यबळ, कोट्यवधी हिमतीचे, कोट्यावधी कर्तृत्वाचे, प्रचंड क्षमतेचे व प्रचंड आर्थिक बळाचे आपले बहुजन लहान गावापासून ते जगातील मोठ्या शहरापर्यंत पसरलेले आहेत. मातृतीर्थावरील मुख्य स्मृती मंदिराचे काम व्हायचे आहे. 15 हजार स्क्वेअर फुटाच्या सभागृहासह जवळपास 10 हजार स्क्वे. फुटाच्या (आरसीसी) तिन मजली बांधकाम पुर्ण झाले आहे. 25 हजार स्क्वेअर फुटाचा सुंदर बगीचा तयार करण्यात आला आहे. भव्य महाव्दाराची निर्मिती राजस्थानच्या कारागिराकडून केलेली आहे. पैशाअभावी कामाची गती पाहिजे तशी जलद नाही. मराठा सेवा संघ आणि समविचारी परिवर्तनवादी बहुजन संघटनांनी बहुजनांच्या भावी पिढ्यांसाठी अक्षय ‘उर्जास्त्रोत’ असणार्या जिजाऊ सृष्टीच्या उभारणीसाठी दमदार पाऊल टाकले असले तरी आपल्या स्वप्नातील मातृतीर्थाला समस्त बांधवांच्या सहकार्याची नितांत गरज आहे.
देणगी विभागात या, जिजाऊ सेवा द्या, पावती घ्या. बरीच मंडळी आईवडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ दान धर्म करतात, त्यांनी ते जिजाऊ सेवेत द्यावे.आपणांस याव्दारे आवाहन करण्यात येते की, आपापल्या जिल्हयातील दानशूर मंडळीची भेट घेऊन त्यांना या प्रकल्पाची माहिती द्या, व यशाशक्ती मदतीची विनंती करा. सृष्टी विस्तारासाठी आवश्यक जमीन खरेदीकरीता एकरी रुपये 10 लक्ष देणारे जास्तीत जास्त जिजाऊ प्रेमी तयार करावेत, ही आग्रही विनंती. येणारा निधी किंवा चेक / ड्राफ्ट - जिजाऊ सृष्टी - या नावाने - जिजाऊ सृष्टी - कार्यालय, सिंदखेडराजा, जि. बुलढाणा येथे पाठवावा. प्रकल्पास मदत करण्यार्या व्यक्तींची नावे प्रकल्पाच्या प्रवेशव्दाराजवळ मोक्याच्या ठिकाणी नोंदविण्यात येईल, हे प्रामुख्याने सांगावे. (देणगीकरीता 80 जी नुसार इन्कमटॅक्समध्ये सूट आहे.)
अरविंद गावंडे
प्रकल्पसंचालक
सचिन चौधरी
सचिव जिजाऊ सृष्टी,मातृतीर्थसिंदखेडराजा,जि.बुलढाना
Tags:
Special
