चितळेरोड येथे मोबाईल शॉपी आणि रिक्षाची तोडफोड!




। अहिल्यानगर । दि.09 मार्च 2026 । अहिल्यानगर शहराच्या मध्यवर्ती भागातील चितळे रोड येथे आज (सोमवार दि.09) रोजी दुपारी वाद झाला. यामध्ये एका मोबाईल शॉपीची आणि रिक्षाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली.

शहरातील अत्यंत वर्दळीच्या भागात ही घटना घडल्याने काही काळ तणावाचे वातावरण बनले होते. घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

सोमवारी (दि09) रोजी दुपारच्या सुमारास चितळे रोड येथे एका मोबाईल शॉपीचे मालक आणि रिक्षा चालक यांच्यात शाब्दीक वाद झाला. वाद वाढत गेल्याने काही जणांकडून मोबाईल शॉपी आणि रिक्षाची तोडफोड करून नुकसान करण्यात आले, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 

Post a Comment

Previous Post Next Post