सापडलेल्या बालकाच्या पालकांचा शोध घेण्यासाठी आवाहन

सापडलेल्या बालकाच्या पालकांचा शोध घेण्यासाठी आवाहन


। अहिल्यानगर । दि.12 मार्च 2026 ।  पाथर्डी तालुक्यातील पिंपळगाव कासार येथे सुमारे १ वर्ष ७ महिने वयाचा चि. रामेश्वर नावाचा बालक आढळून आला आहे. या बालकास सध्या स्नेहालय संचलित 'स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र', केडगाव (अहिल्यानगर) येथे सुरक्षितपणे दाखल करण्यात आले आहे. या बालकाचे पालक अथवा नातेवाईक यांनी तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी प्रशांत गायकवाड यांनी केले आहे.

​या बालकाच्या पालकांनी व नातेवाईकांनी ओळख पटवण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी प्रशांत गायकवाड (भ्रमणध्वनी क्र. ९०२८२८२५४९) तसेच स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राचे श्री. वारुळे (भ्रमणध्वनी क्र. ९०११०२६४८३) यांच्याशी संपर्क साधावा, असे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post