परकीय चलनांसह 60 हजाराचा मुद्देमाल हस्तगत
शिर्डी येथे भाविकाची बॅग लिफ्टिंग करणारे दोघे जेरबंद
। अहिल्यानगर । दि.09 जारेवारी 2026 । शिर्डी येथे भाविकाची बॅग लिफ्टींग करणार्या 2 आरोपींकडुन परकिय चलनांसह 60 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. आशिष रविंद्र मंगलम (वय 20, रा. अशोकनगर, श्रीरामपूर, ता. श्रीरामपूर), विठ्ठल संजय शेलार (वय 20, रा. अशोकनगर, निपाणी वडगांव, ता. श्रीरामपूर) अशी आरोपींची नावे आहेत.
पुजीता गोविंद रेड्डी (वय 25,रा. जयनगर, बोलमानडोंडील रायचुर, कर्नाटक) हे त्यांच्या कुटुंबासह दि.24 डिसेंबर रोजी रात्री 8 वा.शिर्डी साईबाब मंदिर येथे दर्शन घेवुन शिर्डी साईबाबा संस्थान भक्तीनिवास येथे गेटवर बॅग ठेवलेली असताना कोणीतरी अज्ञात आरोपींनी बॅगेतील मोबाईल, भारतीय व अमेरिकन चलन, आधार कार्ड, 2 क्रेडीट कार्ड, असा एकुण 60 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला.याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक दिपक मेढे, पोलीस अंमलदार, राहुल द्वारके, भिमराज खर्से, राहुल डोके, सतिष भवर, भगवान धुळे यांच्या पथकाने कारवाईत करत दोघांना जेरबंद केले. सदरचा गुन्हा हा आशिष मंगलम व विठ्ठल शेलार यांनी केला असल्याची व ते श्रीरामपूर परिसरामध्ये असल्याची माहिती पथकाला मिळाली.
पथकाने तात्काळ अशोकनगर, श्रीरामपूर परिसरामध्ये जाऊन त्यांचा शोध घेतला. त्यांनी त्यांची नावे आशिष रविंद्र मंगलम (वय 20, रा. अशोकनगर, श्रीरामपूर, ता. श्रीरामपूर), विठ्ठल संजय शेलार (वय 20, रा. अशोकनगर, निपाणी वडगांव, ता. श्रीरामपूर) असे असल्याचे सांगितले. त्यांच्या ताब्यातून 50 हजार रुपये किमतीचा एक आयफोन, 10 हजार रुपये त्यामध्ये विदेशी चलनाच्या नोटा असा एकुण 60 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
