अण्णासाहेब पाटील महामंडळाचे कामकाज सुरळीत
नवीन पात्रता प्रमाणपत्र (LOI) प्रक्रिया लवकरच सुरू होणार; गैरव्यवहार करणाऱ्यांवर कारवाई
| अहिल्यानगर | दि.18 नोव्हेंबर 2025 | अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे सर्व नियमित कामकाज सुरळीत सुरू असून, लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या व्याज परताव्याचे वितरण कोणत्याही अडथळ्याविना नियमितपणे केले जात आहे. सप्टेंबर २०२५ अखेर होल्ड व स्थगित प्रकरणे (ब्लॉक प्रकरणे वगळता) सोडून, व्याज परताव्यासाठी दावा करणाऱ्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर परतावा जमा करण्यात आला आहे.
नवीन पात्रता प्रमाणपत्र (LOI) देण्याच्या प्रक्रियेत आवश्यक तांत्रिक सुधारणा पूर्ण केल्यानंतर ही प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल, अशी माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी दिली.
कामकाज बंद असल्याबाबतच्या बातम्या आधारहीन
काही माध्यमांमध्ये महामंडळाचे कामकाज बंद असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. या संदर्भात महामंडळाने स्पष्ट केले की, पात्रता प्रमाणपत्र संबंधीची प्रक्रिया काही तांत्रिक कारणांमुळे तात्पुरती स्थगित करण्यात आली असून, व्याज परतावा व बँक मंजुरीसंबंधीचे कामकाज नियमितपणे सुरू आहे.
नाशिक–अहिल्यानगरमध्ये एजंटांकडून गैरव्यवहार; गुन्हे दाखल
अकाऊंट व्हॅलिडेशन प्रणाली लागू; लाभार्थ्यांनी कागदपत्रांसह संपर्क साधावा
नाशिक आणि अहिल्यानगर येथील गैरव्यवहारासारखी प्रकरणे पुन्हा घडू नयेत म्हणून महामंडळाने अकाऊंट व्हॅलिडेशन प्रणाली लागू केली आहे. एजंटमार्फत दाखल झालेली संशयित प्रकरणे तात्पुरती ब्लॉक करण्यात आली आहेत.ज्या लाभार्थ्यांची प्रकरणे ब्लॉक आहेत त्यांनी आपली मूळ कागदपत्रे घेऊन संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा समन्वयकांशी तात्काळ संपर्क साधावा. जिल्हा समन्वयकांचे संपर्क क्रमांक udyogmahaswayam.gov.in प्रणालीवर उपलब्ध आहेत.
