दूध दरवाढ आणि भेसळीविरोधात खा. लंके आक्रमक
शेतकरी आणि ग्राहकांशी निगडीत प्रश्नावर संसदेत आंदोलन
| अहिल्यानगर | 20 ऑगस्ट 2025 | दूध हे शेतकऱ्यांसाठी केवळ उत्पादन नसून जोडधंदा आणि जीवन जगण्याचा अविभाज्य घटक आहे. मात्र आज दुधाला योग्य भाव मिळत नाही, उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने विक्री करावी लागत आहे. दुसरीकडे दुधात भेसळ करणारे लोक सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी थेट खेळ करत आहेत.
या शेतकरी आणि ग्राहकांशी निगडित प्रश्नांवर इंडिया आघाडीच्या खासदारांनी मंगळवारी संसद भवनासमोर आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधले. दुधाची दरवाढ आणि भेसळीविरोधात खासदार नीलेश लंके यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारने दोन्ही प्रशनावर तत्काळ निर्णय घेण्याची मागणी केली.
या आंदोलनात खासदार नीलेश लंके इंडिया आघाडीचे खासदार नामदेव किरसान, शोभाताई बच्छाव, बळवंतराव वानखेडे, छत्रपती शाहू महाराज, धैर्यशील मोहिते पाटील, श्याम बर्वे, संजय देशमुख, प्रियंका चतुर्वेदी, वर्षा गायकवाड, बजरंगबप्पा सोनवणे,अरविंद सावंत, डॉ.कल्याण काळे आदी सहभागी झाले होते.
खासदार नीलेश लंके व इतर खासदारांनी संसद भवनात आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधले. यावेळी दूध भेसळीचा प्रतिकात्मक प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले.