श्री रेणुकामाता मल्टिस्टेट आडते बाजार शाखेचा १९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
कार्यक्रमाचा शुभारंभ संस्थेचे जेष्ठ खातेदार सौ. लाजवंती पांढरे, सुभाष पांढरे आणि अवतार गुरली यांच्या हस्ते करण्यात आला. सिनियर क्लार्क सचिन राठोड यांनी उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प व आरती संग्रह देऊन स्वागत केले.
माजी शाखाधिकारी दत्तात्रय अंकम यांनी संस्थेमधील व्यक्तिगत कर्जे, विविध कर्ज योजना तसेच ठेवींवरील आकर्षक व्याजदरांविषयी सविस्तर माहिती दिली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रशांत भालेराव यांनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत आडते बाजार शाखेच्या प्रगतीचे कौतुक केले आणि कर्मचाऱ्यांच्या मेहनतीची प्रशंसा केली.
यावेळी नगर मनपा शाळेच्या माजी मुख्याध्यापिका प्रमिलाताई चिलका, नीता सोनग्रा, मुस्कान सोनग्रा, शिवप्रसाद तोतला, शिक्षिका सौ. शैलजा ठोकळ, प्रदीप ठोकळ, विनोद चंगेडिया, ऍड. देसाई, ऍड. कुंभकर्ण, नूरमोहमद पठाण सर, तसेच मुख्य कार्यालयातील ऍड. नितीन भालेराव, मुख्य कार्यकारी अधिकारी हरिश्चंद्र मोरे, प्रशासकीय अधिकारी कार्तिक पोनगंटीवार, राहुल जोशी,
ऑडिटर सचिन जाखडे, सतीश इंगळे, नानासाहेब करंडे, भरत लहाने, मोहन श्रीखंडे आणि शाखेचे पालक अधिकारी अण्णासाहेब राजळे यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वैभव पालवे, आनिष कुलकर्णी, प्रशांत वाळके, अनिता कोहोक यांसह संपूर्ण शाखा कर्मचारीवृंदाने परिश्रम घेतले.