| मुंबई | दि.११ जुलै २०२५ | महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला एक अभूतपूर्व अशी ऐतिहासिक पंरपरा आहे. लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्य संग्रामाला व्यापक स्वरूप मिळावे यासाठी शिवजयंती आणि गणेशोत्सव उपक्रम सुरू केले.
या उत्सावाला शेकडो वर्षांहून अधिक वर्षांची पंरपरा असून, सार्वजनिक गणेशोत्सवाला महाराष्ट्र राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा गुरूवारी सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी विधानसभेत केली.
विधानसभेत बोलतांना मंत्री आशिष शेलार म्हणाले की, महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव १८९३ साली लोकमान्य टिळकांनी सुरू केला, या उत्सवाची पोर्शभूमी ही सामाजिक, राष्ट्रीय, स्वतंत्रता, स्वाभिमान, स्वभाषा या सगळ्यांशी संबंधित आहे. त्या पद्धतीनेच आज चालू आहे. महाराष्ट्राचा गौरव आणि अभिमान असावा असलेला आपला गणेशोत्सव आहे.