पर्यावरण दिनाच्या निमित्ताने महानगरपालिकेमार्फत झाडांवरील जाहिराती हटवण्याची मोहीम
। अहिल्यानगर । दि.04 जुन 2025 । पर्यावरण दिनाच्या निमित्ताने गुरुवार, ५ जूनपासून शहरातील झाडांवर लावलेल्या जाहिराती काढणे, फांद्यांमध्ये अडकलेला नायलॉन मांजा काढण्याची मोहीम महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या उद्यानांपासून या मोहिमेला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त संतोष टेंगले यांनी दिली.
👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग
शहरातील अनेक झाडांवर खिळे ठोकून पोस्टर, बॅनर लावून जाहिराती केल्या जात आहेत. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने या जाहिराती हरवणे, झाडांमध्ये अडकलेला नायलॉन मांजा काढणे, झाडाभोवती असलेले जुने व खराब झालेले, तुटफूट झालेले ट्री गार्ड काढून घेणे आदी कामे या मोहिमेत करण्यात येणार आहेत. उद्यान विभागामार्फत ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग
तसेच, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उद्या, ५ जून रोजी महानगरपालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत शेकडो वृक्षांची लागवड करून शहरात हरित आवरण वाढवण्याचा आणि निसर्गसंपन्न वातावरण निर्मितीचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग
शहरात ज्या ठिकाणी झाडांवर जाहिरात केलेली असेल, मांजा अडकलेला असेल, तेथील नागरिकांनी उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजन यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे