। अहिल्यानगर । दि.04 जुन 2025 । जामखेड येथील मराठा सेवक अवधूत पवार यांचे वडील सिनातीरचे संपादक प्रसिद्ध लेखक - कवी प्रा. आ. य. पवार यांचे नुकतेच निधन झाले. या पार्श्वभूमीवर मराठा संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांनी पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सांत्वनपर भेट घेतली.
यावेळी मनोज जरांगे यांनी पवार कुटुंबीयाचे विचारपूस करून सांत्वन केले. यावेळी बावी सोसायटीचे चेअरमन सुंदरदास बिरंगळ, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष तात्यासाहेब बांदल, संभाजी मुळे, संभाजी ढोले, दादासाहेब ढवळे, बाळासाहेब राऊत, किरण पवार, भाऊराजे शिंदे, महादेव डोके, हिरालाल घुमरे सर, कृष्णकुमार मुरुमकर आदिसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
अवधुत पवार यांनी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडचे काम केले आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून ते सामाजिक कामात सक्रिय आहे. मराठा क्रांती मोर्चात देखील त्यांनी हिरीरीने सहभाग नोंदविला होता. त्यांच्या समाजिक कामाची दखल घेत मनोज जरांगे पाटील यांनी त्यांची भेट घेवून सांत्वन केले आहे.