विळद शिवारात वाळूची चोरटी वाहतूक करणारा ढम्पर पकडला
एमआयडीसी पोलिसांची कारवाई
। अहिल्यानगर । दि.04 जुन 2025 । विना परवाना वाळूचे उत्खनन करुन वाळूची चोरटी वाहतूक करणारा ढम्पर एमआयडीसी पोलिसांनी सापळा रचून पकडला. या कारवाईत टेम्पो चालकास ताब्यात घेऊन 12 लाख 40 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.ही कारवाई ३ जून रोजी विळद शिवारातील विळद पाण्याच्या टाकी जवळ केली.
👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग
याबाबतची माहिती अशी की सपोनि.माणिक चौधरी यांना माहिती मिळाली की, एक डंपर हा नगर मनमाड हायवेने विना परवाना बेकायदा चोरुन वाळुची वाहतुक करत असुन डंपर हा नगर मनमाड हायवेने येत आहे. आत्ता विळद पाण्याचे टाकी जवळ सापळा लावल्यास मिळुन येईल अशी गुप्त बातमी मिळाल्याने एमआयडीसी पोलीस पथक तयार करुन विळद पाण्याचे टाकी जवळ सापळा लावुन थांबले असता राहुरीकडून नगरकडे येणारे रोडने एक पांढरे केशरी रंगाचा डंपर येतांना दिसला.
👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग
तेव्हा पोलिसांनी त्यास थांबण्याचा इशारा केला असता डंपर चालकाने डंपर थांबविला. तेव्हा पोलिसांनी डंपरची पाहणी केली असता त्यामध्ये वाळु असल्याची खात्री झाल्याने त्या डंपर चालकास वाळु वाहतुकीचा परवाना बाबत विचारले असता त्याने परवाना नसल्याचे कळविल्याने त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव आकाश संदिप रामफळे, (वय २४, हल्ली रा. कारेगाव ता शिरुर, जि पुणे, मुळ रा. मुंगुसगाव, ता. श्रीगोंदा, जि.अ.नगर) असे असल्याचे सांगितले. या इसमाचे ताब्यात १२ लाख रुपयाचा डंपर (क्र. एम एच १२ एच डी ४०७०) व ४०हजार रुपये किमतीची ४ ब्रास वाळु असा एकुण १२ लाख ४० हजार रुपयाचा मुद्देमाल मिळुन आला.
👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग
या प्रकरणी ढम्पर चालक आकाश रामफळे याचे विरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात बी एन एस ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उप अधीक्षक अमोल भारती यांचे मार्गदर्शानाखाली स पो नि माणिक चौधरी, पोलीस अंमलदार सचिन आडबल, संदीप पितळे,किशोर जाधव, गोरक्षनाथ केदार, अनिल उगलमुगले,अक्षय रोहोकले यांचे पथकाने केली आहे.