जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी


। अहिल्यानगर । दि.13 जुन 2025 । जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी  प्रभारी अपर जिल्हादंडाधिकारी अरुण उंडे यांनी  मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये 13 जुन  ते 26 जुन 2025 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. 

सदरचे आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणार्‍या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post