मेंढपाळाच्या पालावर दरोडा टाकणार्या टोळीला बेड्या!
पाच अटकेत, तिघे फरार । स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
। अहिल्यानगर । दि.16 जून 2025 । मेंढपाळाच्या पालावर रात्रीचे वेळी दरोडा टाकणार्या टोळीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. विळदसह छत्रपती संभाजीनगर येथील दरोड्याचे गुन्हा याच टोळी केल्याची समोर आले आहे. या टोळीतील पाच आरोपींकडून तीन लाख चार हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर टोळीतील तिघे अद्यापही फरार आहेत.
👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग
भैय्या कडू काळे (वय 18, रा. शिरोडी, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर), ताराचंद विरूपन भोसले (वय 35, रा.गाजगाव, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर), किसन उर्फ विजय गौतम काळे (वय 23, रा. पानसवाडी, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर), नागेश विरूपन भोसले (वय 20, रा. गाजगाव, ता.गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर), सोनूल लक्षरी भोसले (वय 19, रा. बिडकीन, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) यांना ताब्यात घेतले आहे.
बदाम कडू काळे (रा. शिरोडी, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर), रघुवीर विरूपन भोसले (रा. गाजगाव, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर), महेश नंदू काळे, (रा.खोसपुरी, ता.अहिल्यानगर) हे तिघे फरार आहेत. फिर्यादी नामे पोपट बन्सी होडगर (वय 35, धंदा मेंढीपालन, रा. पिंप्री घुमट, विळद) हे मेंढ्या चारुन रात्री शेतामध्ये कुटुंबीयांसह झोपले असताना अज्ञात सहा ते सात आरोपींनी त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण करुन, चाकूचा धाक दाखवून त्यांच्या पत्नीचे दागिणे जबरीने चोरुन नेलेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी घडलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यांची माहिती प्राप्त होताच पोनि दिनेश आहेर यांना गुन्हयाचा समांतर तपास करणेबाबत आदेश दिले. त्यानुषंगाने पोनि आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसई तुषार धाकराव व पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, बिरप्पा करमल, गणेश धोत्रे, अरूण गांगुर्डे, भगवान धुळे, गणेश लोंढे, शाहीद शेख, फुरकान शेख, बाळासाहेब नागरगोजे, सोमनाथ झांबरे, रविंद्र घुंगासे, आकाश काळे, भगवान थोरात, भाऊसाहेब काळे, सुनील मालणकर, रमीजराजा आत्तार, अमोल कोतकर, अमृत आढाव, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, चंद्रकांत कुसळकर व अरूण मोरे अशाचे पथक तयार करुन रवाना केले.
👉क्लीक करुन बातमी वाचा...
सदरचा गुन्हा किसन उर्फ विजय गौतम काळे, रा.पानसवाडी, ता.नेवासा, जि.अहिल्यानगर याने त्याचे साथीदारासोबत केला असून ते चोरीचे सोने विक्री करण्यासाठी मोटार सायकलवरून नेवासामार्गे पांढरीपूल येथे येणार असल्याची माहिती प्राप्त झाली. पथकाने पंचासमक्ष मिळालेल्या माहिती वरून सापळा रचून पाच जणांना पकडले. या टोळीने विळद गावातील डोंगर माथ्यावर असलेल्या मेंढपालाचे पालावर पाच ते सहा दिवसांपूर्वी रात्रीचे वेळी चोरी केल्याचा मुद्देमाल करण्यात आला आहे. 15 दिवसांपूर्वी मांजरी शिवार, ता.गंगापूर येथेही मारहाण करून चोरी केल्याची माहिती सांगितली.