। अहिल्यानगर । दि.27 मे 2025 । महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे कांद्याच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे कांद्याचा पुरवठा कमी होण्याची शक्यता आहे. परिणामी, कांद्याचे भाव वाढू शकतात.
अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दि.26 मे रोजी एक नंबर कांद्याला 1700 रुपये भाव मिळाला, दोन नंबर कांद्याला 1400 रुपये भाव मिळाला, तीन नंबर कांद्याला 1000 रुपये भाव मिळाला तर चार नंबर कांद्याला 700 रुपये भाव मिळाला आहे.
दि.26 मे रोजी कांद्याची आवक व बाजारभाव खालील प्रमाणे आहेत. गावरिान कांदा एकुण आवक 16,118 गोण्या गावराण कांदा एकूण आवक क्विंटलमध्ये 8, 865 आहे. यामध्ये अपवादात्मक गोण्यांचे जास्त बाजारभाव असू शकतात.
Tags:
Ahmednagar