। अहिल्यानगर । दि.30 मे 2025 । पंकज कॉलनी, सावेडी येथील रहिवासी व सेवानिवृत्त रेल्वे अधिकारी दादासाहेब नारायण सोले पाटील (वय ९०) यांचे ३० मे रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर नालेगाव अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांचे मुळ गांव अरणगांव ता. जामखेड होते.त्यांच्यामागे, १ मुलगा, ३ मुली, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे. जेष्ठ विधिज्ञ प्रा. नीळकंठ सोले पाटील यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.
जिल्हा सहकारी बॅकेचे जनसंपर्क अधिकारी भारत सोले पाटील यांचे चुलते तर एडीसीसी बँकेचे स्टेशनरोड शाखेचे शाखाधिकारी संजय सोले पाटील यांचे ते वडील होत.
Tags:
Ahmednagar