शिष्यवृत्ती परीक्षेत अहिल्यानगर जिल्ह्याचा निकाल सरासरी साडेसहा टक्क्यांनी वाढला

शिष्यवृत्ती परीक्षेत अहिल्यानगर जिल्ह्याचा निकाल सरासरी साडेसहा टक्क्यांनी वाढला

पाचवीचा 36.44 तर आठवीचा 14.75 टक्के निकाल  


। अहिल्यानगर । दि.26 एप्रिल 2025। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने फेबु्रुवारीत घेण्यात आलेल्या पुर्व उच्च प्राथमिक व पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल  काल (दि.25) रोजी जाहीर झाला. या परिक्षेत जिल्हा परिषद शाळांचा इयत्ता 5 वी चा निकाल 36.44 टक्के असून इयत्ता आठवीचा निकाल 14.75 टक्के आहे. गतवर्षीच्या निकालाच्या तुलनेत इयत्ता 5 वीच्या निकालात 6.54 टक्के व इयत्ता आठविच्या निकालात 6.24 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी इयत्ता पाचवी चे जि प शाळेचे 1066 विद्यार्थी जास्त पात्र झाले असून एकुण 4393 विद्यार्थी पात्र झाले आहेत. तर गतवर्षीच्या निकालाच्या तुलनेत इयत्ता आठवीचे जि प शाळेचे 69 विद्यार्थी जास्त पात्र झाले असून एकुण 158 विद्यार्थी पात्र झाले आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिक्षणाधिकारी प्राथमिक आस्कर पाटील यांच्या नियोजनातून मिशन आरंभ उपक्रमांतर्गत शिष्यवृत्ती परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी घेतलेल्या सराव चाचण्यांचा फायदा झाल्याचे या निकालातून स्पष्ट होत आहे.

वर्ष 2024-25 मध्ये परीक्षा इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी साठी एकुण 11 सराव चाचण्या घेण्यात आल्या पैकी 2 सराव चाचण्या ऑनलाईन स्वरुपाल, 4 सराव चाचण्या शाळा स्तरावर व 5 सराव चाचण्या परीक्षा केंद्र निर्माण करून घेण्यात आल्या. तसेच वर्षभर ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग घेण्यात आले. त्याचीच फलनिष्पती या निकालातून स्पष्ट होते.

या परीक्षेसाठी इयता पाचवीचे सर्व व्यवस्थापनाचे एकूण 34570 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते त्यापैकी 33845 विद्यार्थी उपस्थित होते व 9655 विद्यार्थी (28.53%) पात्र झाले आहेत. इयत्ता आठवीचे एकूण 22070 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते त्यापैकी 21672 विद्यार्थी उपस्थित होते. पैकी 4440 विद्यार्थी (20.49%) पात्र ठरले आहेत.

👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग

अहिल्यानगर जिल्ह्याचे सदर परीक्षेला इयता पाचवीचे विद्यार्थी प्रविष्ठ होण्याचे प्रमाण राज्यात दुसन्या क्रमांकाचे आहे तर इयत्ता आठवीसाठी हे प्रमाण तिसर्‍या क्रमांकाचे आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचे इयत्ता पाचवीची पात्र विद्यार्थी संख्या राज्यांमध्ये तिसर्‍या क्रमांकाची व इयत्ता आठवीसाठी चौथ्या क्रमांकाची आहे. एकूण निकालामध्ये कोपरगाव तालुक्याचा इयत्ता पाचवी चा निकाल सर्वाधिक 47.37% असून इयत्ता आठवी मध्ये सर्वाधिक निकाल पारनेर तालुक्याचा 32.33% आहे. 

👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग  

Post a Comment

Previous Post Next Post