। मुंबई । दि.05 डिसेंबर 2024 महायुती सरकारचा शपथविधी सोहळा गुरुवार (दि.05 डिसेंबर 2024) रोजी संध्याकाळी 5 वाजता मुंबईच्या आझाद मैदानावर पार पडणार आहे. या महायुतीच्या शपथविधी सोहळ्याचे महानियोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात आता एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती गिरीष महाजन यांनी दिली.
आज होणार्या शपथविधी सोहळ्यामध्ये केवळ तीन नेते शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. भाजपच्या विधिमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीस यांची निवड झाल्यामुळे फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचे जाहीर झाले आहे.
तर उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार आणि एकनाथ शिंदे शपथ घेतील अशी माहिती समोर येत आहे. आज होणार्या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मान्यवर आज उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणविस आणि उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.
