मराठा पतसंस्थेच्या तज्ञ संचालकपदी बबनराव रोहकले


। अहिल्यानगर । दि.05 डिसेंबर 2024 । अहिल्यानगर जिल्हा मराठा नागरी पतसंस्थेच्या तज्ञ संचालक पदी शहरातील मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक व सामाजिक कार्यकर्ते बबनराव रोहकले यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली आहे.

नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये तज्ञ संचालकांची  निवडी करण्यात आली आहे. संस्थेच्या आजपर्यंतच्या वाटचालीत त्याचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच सुरवातीच्या काळात त्यांनी सभासद वाढीसाठी प्रयत्न केले.

बबनराव रोहकले यांच्या समाजामधील महत्त्वपूर्ण योगदाना बद्दल त्यांची पतसंस्थेच्या तज्ञ संचालकपदी निवड करण्यात आली असल्याची माहिती मराठा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष इंजि.विजयकुमार ठुबे यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post