तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये होणार्या मोटारसायकल चोरी गुन्ह्यांचा तपास करत असताना पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मोटार सायकलचोर मनोज मांजरे याने महिन्यापूर्वी अहिल्यानगर शहरातील तपोवन व सावेडी परिसरातुन मोटारसायकल चोरी केल्याची माहिती मिळाली. त्यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील व त्याच्या पथकाला तोंडी आदेश देत कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आरोपी मांजरे यास ताब्यात घेतले.
त्याने महिन्यापुर्वी सावेडी, तपोवन या परिसरातुन बुलेट व इतर मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. घराच्या आडोशाला ही वाहने लपवून ठेवली होती. दोन बुलेट व एक टि.व्ही. एस कंपनीची रायडर मॉडेलची मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील, पोहेकॉ दत्तात्रय जपे, सुनील शिरसाठ, अहमद इनामदार, भानुदास खेडकर, सुधीर खाडे, सुरज बावळे, गणेश धोत्रे, पोना वसिम पठाण, पो.कॉ. सुमित गवळी, शिरीष तरटे, पो. कॉ. सतीश त्रिभुवन, दत्तात्रय कोतकर, बाळासाहेब भापसे, सतीश भंवर, संदिप गिर्हे, राहुल म्हस्के यांनी केली आहे.