बस उलटून झालेल्या अपघात 11 जणांचा मृत्यू

मुंबई । दि.30 नोव्हेंबर 2024  गोंदिया जिल्ह्यातील अर्जनी तालुक्यातील खजरी गावाजवळ शुक्रवार (दि.29) रोजी दुपारी 1 च्या सुमारास बसला भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भिषण होता की या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. यातील मृताचा आकडा वाढण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.

शिवशाही बस उलटून 11 जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी दुपारी गोंदिया-कोहमारा मार्गावरील डव्वा जवळ घटना घडली आहे. या अपघातातील काही जखमींची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांकडून अपघातग्रस्तांना तातडीने मदत जाहीर केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा-गोंदिया ही शिवशाही बस आज दुपारी भंडार्‍याहून गोंदियाकडे येथे जात होती. बस चालकाने एका दुचाकीला ओव्हरटेक करताना डव्वा जवळ बस उलटून जवळपास 20 फूट रस्त्यापासून घासत गेली. त्यामुळे बसमधील 11 प्रवाशांना मृत्यू झाला तर 29 प्रवासी जखमी झाले आहे. अपघातात गंभीर जखमी असलेल्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने यात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post