। मुंबई । दि.30 नोव्हेंबर 2024 विधानसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर राकजीय घडोडींना वेग आला होता. दरम्यान, लवकरच मुख्यमंत्र्याचा शपथवीधी कार्यक्रम पार पडले अशी चर्चा सुरु असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि काळजीवाहू मुख्यंमत्री यांची काय चर्चा झाली ही चर्चा गुलदस्त्यात आहे. या भेटीमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याने राजकीय घडामोडी पुढील काळात काय घडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
या दोन नेत्यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या आधी देखील गणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. त्यावेळीही या दोन नेत्यांमध्ये जवळपास 15 मिनिटे चर्चा झाली होती. शुक्रवारी जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.
