कोतवाली पोलिसांची कारवाई ; मोटारसायकल चोरी करणारा जेरबंद

अहिल्यानगर । दि.30 नोव्हेंबर 2024 शिक्षणासाठी नगरमध्ये राहणार्‍या तरुणाची दुचाकी दि. 9 नोव्हेंबर 202 रोजी मध्यरात्री बाराच्या सुमारास पार्किंगमधून चोरीला गेली होती. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास सुरु असताना मोटार सायकल चोरी करणारा आरोपी मुद्देमालासह कोतवाली पोलिसांनी जेरबंद केला आहे.

माहिती अशी की, कोतवाली पोलिस सदर गुन्ह्याचा तपास व आरोपीचा शोध घेत असतांना कोतवाली गुन्हे शोध पथकाने सदर घटनेचे तांत्रिक विश्लेषण करुन सदरची मोटारसायकल ही कोठला झोपडपटटी, अहिल्यानगर येथील आरोपी मोहसिन मुसा शेख यानेच नेलेबाबत खात्री झाल्याने सदर आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारपूस करता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी आरोपीकडून चोरीची मोटार सायकल हस्तगत केली आहेे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, सपोनि योगीता कोकाटे, पोहेकाँ योगेश भिंगारदिवे, विशाल दळवी, सलिम शेख, विक्रम वाघमारे, शरद वाघ, मपोना वंदना काळे, पोकाँ अभय कदम, अमोल गाढे, सतिष शिंदे, अतुल काजळे  यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post