खा. नीलेश लंके यांचे उपोषण मागे

खा. नीलेश लंके यांचे उपोषण मागे

एलसीबी विरोधातील तक्रारींची १५ दिवसांत चौकशी

राज्याच्या पोलीस महासंचालक रष्मी शुक्ला यांचे आश्वासन
 
मा. मंत्री बाळासाहेब थोरात यांची शिष्टाई फळाला 

 
| अहमदनगर | दि.26 जुलै 2024 | नगर पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराबाबत खासदार नीलेश लंके यांनी केलेल्या मागण्यांवर राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी सकारात्मक भूमिका घेत लंके यांच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र चौकशी समिती नेमून पंधरा दिवसांत अहवाल देण्याचे लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर खा.लंके यांनी पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर सुरू केलेले आमरण उपोषण गुरूवारी,चौथ्या दिवशी दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास मा. मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन मागे घेण्यात आले.

खा. लंके यांनी उपोषण सुरू केल्यानंतर नगरचे पोलीस अधिक्षक राकेश ओला यांच्याशी शिष्टमंडळाने तीन वेळा चर्चा केली. मात्र ते त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने आंदोलनात तोडगा निघू शकला नव्हता. विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याकडूनही ठोस आश्वासन देण्यात येत नसल्याने तिसर्‍या दिवशीपर्यंत या आंदोलनाची कोंडी फुटली नव्हती.

गुरूवारी सकाळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी उपोषणस्थळी येत खा. नीलेश लंके यांच्याशी चर्चा केली. लंके यांच्याशी चर्चेनंतर थोरात यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रेय कराळे यांच्याशी चर्चा केली. मात्र लंके हे आपल्या मागण्यांवर ठाम राहून त्यांना कालबध्द आश्वासन हवे होते. त्यामुळे मा. मंत्री थोरात यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. शुक्ला व मा. मंत्री थोरात यांच्यात सकारात्मक चर्चा होऊन उपोषण सुटण्याचा मार्ग मोकळा झाला.

मा. मंत्री बाळासाहेब थोरात व रष्मी थोरात यांच्यात झालेल्या चर्चेनुसार खा. लंके यांनी केलेल्या मागण्या त्यांनी मान्य केल्या. त्यासंदर्भात विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रेय कराळे यांच्याशी शुक्ला यांची चर्चा झाल्यानंतर झालेल्या चर्चेनुसार लंके यांना कराळे यांनी लेखी आश्वासन दिले. पोलीस अधिक्षक कार्यालयाकडून कराळे यांचे पत्र लंके यांना देण्यात आल्यानंतर खा. लंके यांच्यासह त्यांच्यासोबत उपोषणास बसलेले मा. नगरसेवक योगीराज गाडे, बबलू रोहकले यांना बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते लिंबू पाणी देण्यात येऊन आंदोलन मागे घेण्यात आले. 

पोलीस अधिक्षकांची भेट नको !
उपोेषण सुरू होऊन दोन दिवस पोलीस अधिक्षक राकेश ओला हे उपोषणस्थळी  फिरकले नाहीत. त्यामुळे तिसर्‍या दिवशी खा. नीलेश लंके यांनी राकेश ओला हे चर्चेसाठी आले तरी मी त्यांच्याशी बोलणार नाही अशी भूमिका घेतली. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून आश्वासन देण्यात आल्यानंतर मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते त्यांनी लिंबू पाणी घेऊन उपोषण मागे घेतले. 

 

Post a Comment

Previous Post Next Post