स्वबळावर विधानसभा निवडणूक लढणार : राज ठाकरे

| मुंबई | दि.26 जुलै 2024 | लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडणूक न लढता थेट महायुतीला आपला पाठिंबा जाहीर केला होता. तसेच मधल्या काळात भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीगाठी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत सातत्याने होत असल्यामुळे मनसे विधानसभा निवडणुकीत महायुतीचा घटक होईल अशी अपेक्षा होती, मात्र मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुरूवारी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. 

👉खासदार लंके यांच्या उपोषणास भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशचा पाठिंबा 

किमान २२५ ते २५० जागा मनसे लढेल, असे देखील त्यांनी जाहीर केले. त्यामुळे आगामी निवडणूक बहुरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. लोकसभेनंतर आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही निवडणूक ऑटोबर महिन्यात होण्याची शयता आहे. 

👉योजनांच्या अंमलबजावणीत गैरप्रकार खपवून घेणार नाही : मुख्यमंत्री

त्यासाठी महाविकास आघाडी व महायुती या दोन प्रमुख आघाड्यांनी तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीने समन्वय समितीही स्थापन केली आहे. प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी हा पक्षही तयारीला लागला आहे. त्यानंतर राज ठाकरे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.  मुंबईत झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली.

👉वाळू वाहतूक वाहनांचे सुधारित दर जाहीर 

Post a Comment

Previous Post Next Post