| अहमदनगर | दि.23 जुलै 2024 | पुणे विभागातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शालार्थ आयडीच्या ४३९ प्रकरणांची शिक्षण सहसंचालकानी कसून तपासणी केली असून, ३९३ प्रस्तावांमध्ये - त्रुटी आढळल्या आहेत. त्यामुळे फक्त ४६ प्रस्तावच मंजूर करण्यात आले आहेत. कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याबाबत अनेकदा आदेश बजावूनही कनिष्ठ महाविद्यालयाकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैयक्तिक मान्यता मिळाल्यानंतर वेतनासाठी शालार्थ आयडी आवश्यक असतात. अशी माहिती शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनील गाडगे यांनी दिली.
👉 योजनांच्या अंमलबजावणीत गैरप्रकार खपवून घेणार नाही : मुख्यमंत्री
शालार्थ आयडीसाठी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाकडून पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे प्रस्ताव सादर होत असतात. गेल्या काही महिन्यांपासून शालार्थ आयडीच्या कामकाजाची सूत्रे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातील सहसंचालक हरून आतार यांच्याकडे सोपविण्यात आली होती.
👉 वाळू वाहतूक वाहनांचे सुधारित दर जाहीर
आतार यांनी प्रस्तावांची तपासणी करून त्रुटी आढळून आलेले प्रस्ताव पुन्हा पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे पाठवून नियमबाह्य प्रकरणे धुडकावून लावली असल्याने शालार्थ आयडीच्या कामकाजाची सूत्रे. वैयक्तिक मान्यता जावक नोंदवहीची प्रमाणित प्रत नसणे, बिंदुनामावलीची प्रत नसणे, आरक्षण न तपासता शिफारसीने प्रस्ताव करणे, शैक्षणिक अर्हता पडताळणी न करणे, नियुक्तीनंतर शैक्षणिक अर्हता प्राप्त करणे, संच मान्यतेत पद नसताना प्रस्ताव देणे, विलंबाने प्रकरणे सादर करणे, संस्थेकडून खुलाशाची पडताळणी न करता प्रस्ताव देणे, कागदपत्रे प्रमाणित नसणे यासह अन्य काही कारणांमुळे बहुसंख्य प्रस्ताव मंजूर होऊ शकलेले नाहीत.अशी माहिती
👉 प्रक्रिया केंद्रानी अतिरिक्त २० लाख लिटर दूध संकलन करावे : विखे पाटील
शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनिल गाडगे, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, अहमदनगर महिला जिल्हाध्यक्षा सौ आशा मगर, सोमनाथ बोंतले, जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, जिल्हासचिव विजय कराळे, उर्दू जिल्हाध्यक्ष मोहंमद समी शेख, उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष रामराव काळे . जिल्हा सचिव महेश पाडेकर., संभाजी पवार, कार्यवाह संजय भुसारी, हनुमंत रायकर, नवनाथ घोरपडे, सुदाम दिघे, सिकंदर शेख. संजय पवार, संतोष देशमुख, किसन सोनवणे, कैलास जाधव, संतोष शेंदुरकर, संभाजी चौधरी, श्रीकांत गाडगे,रेवण घंगाळे जॉन सोनवणे, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, सचिव विभावरी रोकडे, कार्याध्यक्ष मीनाक्षी सूर्यवंशी, रोहिणी भोर, शकुंतला वाळुज, छाया लष्करे, जया गागरे, अनघा सासवडकर, रूपाली बोरुडे. सोनाली अकोलकर विनाअनुदानितच्या अध्यक्षा रूपाली कुरूमकर आदींना दिली.
👉 चांदणी चौकातील दोन घर फोडीत रोख रकमेची चोरी
