| अहमदनगर | दि.15 जुलै २०२४ | दोन बंद घराच्या दरवाजाचे कडी कोंयंडा, कुलूप तोडून कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला आतील सामनाची उचकापाचक करून घरातील रोख रक्कम चोरून नेली.
ही घटना नगर स्टेशन रोडवरील चांदणी चौका जवळील सैनिक नगर लॉन समोर, पूजा कॉम्प्लेक्स येथे घडली. चोरट्यांनी समरीन फैजान तांबोळी आणि माधुरी शेटे यांच्या बंद घराच्या दरवाज्याचे कडी कोयंडा कुलूप तोडून आतील पंधरा हजार रुपये चोरून नेले.
याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी समरीन तांबोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली अधिक तपास पोलीस हवालदार इनामदार करीत आहे.
Tags:
Crime
