‘तुतारी’शी साधर्म्य असणारे ’पिपाणी’ चिन्ह गोठवले!

 

| मुंबई | दि.२० जुलै २०२२ | शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँगे्रसला लोकसभा निवडणुकीत तुतारी चिन्हाशी साधर्म्य असणारे पिपाणी चिन्हामुळे फटका बसला होता. मात्र शुक्रवारी निवडणूक आयोगाने अपक्ष उमेदवारांच्या निवडणूक चिन्हांच्या यादीतील पिपाणी हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पोर्शभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे.

लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने १० जागा लढवल्या होत्यात नाशिकसह सर्वच जागांवर ४ लाखांहून अधिक मतदान पिपाणीला पडले होते. विशेषतः सातारा लोकसभेत या चिन्हामुळे त्यांच्या उमेदवाराला पराभवाचेही तोंड पहावे लागले होते. त्यातच लोकसभेच्या तुलनेत विधानसभेला अवघ्या काही हजारांचे मताधिय असते.त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन शरद पवार गटाने पिपाणी चिन्ह गोठवण्यासाठी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती.

दिंडोरी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार बाबू भगरे यांच्या पिपाणीला राज्यात सर्वाधिक तब्बल १ लाख ३ हजार ६३२ मते मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने पिपाणी चिन्हामुळे आम्हाला निवडणुकीमध्ये फटका बसल्याची भावना व्यक्त करत हे चिन्ह रद्द करण्यात यावे अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यांच्या मागणीनुसार निवडणूक आयोगाने पिपाणी चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला.

Post a Comment

Previous Post Next Post