| नवीदिल्ली | दि.२० जुलै २०२२ | जगभरात शुक्रवारी सकाळपासूनच सायबर सेवा ठप्प झाल्यामुळे अनेकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मायक्रोसॉफ्टसह अनेक कंपन्याना याचा फटका बसला आहे. ऑस्ट्रेलिया, जर्मनी, अमेरिका, युकेसह भारतालाही याचा फटका बसला आहे. याचा अनेक महत्त्वाच्या सेवांवर परिणाम झाला आहे.
विमानसेवा, बँका, स्टॉक एस्चेंज, पेमेंट सिस्टम, दूरसंचार आणि आपत्कालीन सेवा, आरोग्य यंत्रणा आणि ब्रॉडकास्टर सेवा ठप्प पडल्या आहेत. विंडोज १० च्या जगभरातील युजर्सचे अचानक कॉम्प्युटर आणि लॅपटॉप बंद पडत आहेत. कॉम्प्युटरच्या स्क्रीन अचानक निळ्या पडत असून रिस्टार्ट होत आहेत.
अमेरिकेतील सायबर सियुरिटी कंपनी क्राउडस्ट्राइकने जारी केलेल्या एका अपडेटमुळे ही समस्या उद्भवल्याचे समोर येत आहे. याचा फटका बँका आणि विमान उड्डाणासह जगभरातील सेवांना बसला आहे. कॉम्प्युटर युजर्सच्या स्क्रीनवर एक मेसेज येत आहे. ’तुमच्या कम्प्युटरमध्ये प्रॉब्लेम आहे.
बँकिंग सेवेलाही फटका
मायक्रोसॉफ्टच्या समस्येचा फटका बँकिंग क्षेत्रालाही बसला आहे. कंपनीचा सर्व्हर ठप्प झाल्याने जगभरातील बँकेच्या सेवेवर परिणाम झाला आहे. बँकांचे लॅपटॉप आणि संगणक बंद असल्याने कोणत्याही व्यवहाराचा आणि इतर सेवांचा वापर सध्या बंद झाला आहे. याचा फटका जगभरातील युजर्सना बसत असल्याचे मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे. शुक्रवारी सकाळी लाऊड सेवा विस्कळीत झाल्याने जगभरातील अनेक भागात समस्या निर्माण झाल्या आहेत.
Tags:
Breaking
