खा. शरद पवारांची निवडणूक आयोगाकडे मागणी...

’पिपाणी’ निवडणूक चिन्हांच्या यादीतून वगळा

खा. शरद पवारांची निवडणूक आयोगाकडे मागणी

। मुंबई । दि.25 जुन 2024 । शरदचंद्र पवार यांच्या पक्षाने चांगलीच कामगिरी बजावली असली तरी अनेकठिकाणी पिपाणी चिन्ह दिल्यामुळे शरद पवार गटाच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. याची दखल घेवून शरद पवार यांनी पिपाणी चिन्ह निवडणूक चिन्हांच्या यादीतून वगळण्याची मागणी सोमवारी निवडणूक आयोगाकडे केली आहे. तसेच शरद पवार गटाने याप्रकरणी सर्वो च्च न्यायालयात दाद मागण्याचाही इशारा दिला आहे.

👉 महाविकास आघाडी सर्वाधिक जागा जिंकणार : खा. नीलेश लंके यांचा विश्‍वास

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने ’तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हावर लोकसभेच्या 10 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 8 जागांवर त्यांचा विजय झाला. सातारा लोकसभा मतदारसंघात त्यांचा थोडक्यात पराभव झाला. या ठिकाणी तुतारीशी साधर्म्य असणार्‍या पिपाणीवर निवडणूक लढवणार्‍या अपक्ष उमेदवाराला बरीच मते मिळाली. इतरही मतदारसंघांत शरद पवार गटाला पिपाणीचा फटका बसला. 

👉  बेकरीतील युवकांवर प्राणघातक हल्ला करणारे तिघे अटकेत

या पोर्शभूमीवर पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवून पिपाणी निवडणूक चिन्हांच्या यादीतून वगळण्याची मागणी केली आहे. पिपाणी चिन्हामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभा निवडणुकीत मोठे नुकसान झाले. त्यामुळे निवडणूक आयोगाने यासंबंधी योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली जाईल, असा इशारा शरद पवार गटाने आपल्या पत्राद्वारे दिला आहे.

👉  खासदार निलेश लंके यांचे मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र 

उल्लेखनीय बाब म्हणजे सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा 45 हजार मतांनी पराभव झाला होता. पण याच मतदारसंघात पिपाणी चिन्हावर निवडणूक लढवणार्‍या अपक्ष उमेदवाराला तब्बल 37 हजार मते मिळाली होती. यावर राष्ट्रवादीचा आक्षेप आहे.

Post a Comment

Previous Post Next Post