नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी घेतली इंग्रजीत शपथ

| अहमदनगर |  दि.25 जुन 2024 |  अहमदनगर दक्षिण नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी संसदेत इंग्रजीत खासदार पदीची घेतली शपथ घेतली. त्यांच्या शपथ घेताच नगर शहरातील बुरूडगाव रोड येथील खासदार लंके यांच्या कार्यालयासमोर लंके समर्थकांचे वतीने मोठा जल्लोष करण्यात आला.


तसेच शपथविधी झाल्यानंतर फटाक्याची आतिषबाजी करत पेढे वाटून आनंदात जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी माजी महापौर भगवानराव फुलसौंदर,  अमोल कांबळे, प्रवीण वारुळे, गणेश रोडे, सचिन कराळे, सागर जपकर, शिवाजी कराळे, संचित निकम, रवी धनवटे, सौरभ सुंबे, सुरेश कसाब, अक्षय शिंदे, गणेश तोडमल निलेश लंके प्रतिष्ठान सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये निलेश लंके यांना इंग्रजी बोलता येत नाही म्हणून विरोधकांनी प्रचारात मुद्दा केला होता. एक प्रकारे लंके यांना डिवचणार्‍याच्या तो प्रयत्न होता. मात्र आज लोकनेते खासदार निलेश लंके यांनी इंग्रजीमध्ये शपथ घेवून विरोधकांना चपराक तर दिलीच आहे. तसेच इंग्रजीवर आपले प्रभूत्व आहे हे सुध्दा विरोधकांना दाखवून दिली आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post