सह्याद्री'ने गुणवत्तेचा लौकिक कायम जपला
माजी आ. सुधीर तांबे : गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ
। संगमनेर । दि.30 मे 2024 । सह्याद्री कनिष्ठ महाविद्यालयाने यंदाही उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे. महाविद्यालयाचा इयत्ता बारावीचा निकाल यंदा ९९ टक्के लागला. सह्याद्री संस्थेने गुणवत्तेने आपला लौकिक कायम जपला असल्याचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले.
सह्याद्री विद्यालयामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. संस्थेचे सचिव लक्ष्मण कुटे, सहसचिव दत्तात्रय चासकर रजिस्ट्रार बाबुराव गवांदे प्राचार्य के. जी. खेमनर, उपप्राचार्य जी. एम. डोखे आदी उपस्थित होते.
विज्ञान शाखेचा निकाल ९९ टक्के लागला असून तालुक्यात प्रथम क्रमांक आदिती भास्कर शिंदे तर प्लेन सायन्समधून दसरा क्रमांक मानसी गवांदे या विद्यार्थिनींनी पटकावला. कार्यक्रम प्रसंगी विज्ञान, वाणिज्य आणि कला या तीनही शाखांमध्ये गुणानुक्रमे प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
विज्ञान शाखेत आदिती शिंदे, मानसी गवांदे, साक्षी शिंदे, श्रुती वाकचौरे, वेदांत सागर वाणिज्य शाखेत प्रणव बुद्रुक, संस्कृती कुटे, पूजा वाघ, गौरी नेहे, साक्षी कानकाटे तर कला शाखेत रत्नमाला शेवाळे, अविनाश समशेर, प्राची आचट, अस्मिता वर्षे, प्रगती खरात, अस्मिता उगले यांनी यश संपादन केले.
या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. गणेश गुंजाळ यांनी केले. प्रास्ताविक प्रा. नवनाथ गुंड यांनी केले. चित्रा कुलकर्णी यांनी आभार मानले.