पाचव्या टप्प्यातील अंदाजे सरासरी ५४.३३ टक्के मतदान


।  मुंबई । 21 मे 2024 ।  राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि‍ शेवटच्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया संपली असून आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी    ५४.३३ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.

पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
धुळे- ५६.६१ टक्के

दिंडोरी-  ६२.६६ टक्के

नाशिक –  ५७.१० टक्के

पालघर- ६१.६५ टक्के

भिवंडी-५६.४१ टक्के

कल्याण –  ४७.०८ टक्के

ठाणे –   ४९.८१  टक्के

मुंबई उत्तर – ५५.२१ टक्के

मुंबई उत्तर मध्य – ५१.४२ टक्के

मुंबई उत्तर पूर्व – ५३.७५ टक्के

मुंबई उत्तर पश्चिम – ५३.६७ टक्के

मुंबई दक्षिण – ४७.७० टक्के

मुंबई दक्षिण मध्य- ५१.८८ टक्के


 

Post a Comment

Previous Post Next Post