टँकर सुरू करत गोरगरिबांची भागविली तहान!

 टँकर सुरू करत गोरगरिबांची भागविली तहान!

राजन शिंदे विचार मंचने केले स्वखर्चातून चार पाण्याचे टँकर सुरू

। संगमनेर । 19 मे 2024 ।  भागात शासनाचा टँकर पोहोचत नाही अशा संगमनेर खुर्द गटात येणाऱ्या नांदुरी दुमाला, पेमगिरी, शिरसगाव, धुपे सावरचोळ आणि मेंगाळवाडी या गावांमधील आदिवासी व गोरगरिबांना राजनदादा शिंदे विचारमंचच्यावतीने ४ मोफत पाण्याचे टँकर सुरू करत या भागातील जनतेची तहान भागविण्याचे पुण्याचे काम केले जात आहे,.

संगमनेर तालुक्याच्या बहुतेक भागात मागील वर्षी पाऊस कमी प्रमाणात पडला. त्यामुळे यावर्षी उन्हाळ्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे. मार्च एप्रिल मे या तीन महिन्याच्या कालावधीत महिन्यात तालुक्याच्या पठार भाग तसेच पश्चिम भागातील वरील गावांमध्ये सर्व बंधारे पाणीसाठे, विहिरी बोरवेल, हातपंप आटले आहेत. त्यामुळे या भागातील नागरिक व महिलांचे पाण्यावाचून हाल होत आहे. त्यांनी आत्तापर्यंत प्रशासनालातसेच राजकीय पक्षाच्या नेत्यांना अनेक वेळा निवेदन  देऊन शासनाचा पाण्याचा टँकर सुरू करावा, अशी मागणी केलेली होती.

परंतु अद्यापही प्रशासनाने या भागामध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू केले नाही. त्यामुळे शिरसगाव धुपे सावरचोळ, मेंगाळवाडी पेमगिरी व नांदुरी दुमाला या गावांतील महिलांना चार ते पाच किलोमीटर पायपीट करून हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे.

संगमनेर तालुक्यातील पेमगिरी नांदुरी दुमाला सावरचोळ शिरसगाव धुपे, मेंगाळवाडी व निमगाव पागा या गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाच्यावतीने सातगाव पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आलेली आहे. मात्र ही योजना गेली दोन महिन्यापासून नादुरुस्त झाली आहे. नागरिकांनी अनेक वेळा एकत्र येऊन स्वखर्चाने पाईपलाईन दुरुस्त केली. परंतु आर्थिक पाठबळ नसल्याने पाईपलाईनचे काम अपूर्ण राहिले आहे. त्यामुळे या गावातील गोरगरीब व आदिवासी ठाकर तसेच दिन दलित जनतेचे पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याचे अतोनात असे हाल होत आहे.

पाण्याची गंभीर समस्या आहे आणि ती सोडवणे गरजेचे आहे, अशी मनाशी खुणगाठ बांधत सामाजिक बांधिलकी मनात ठेवून राजनदादा युवा मंचचे अध्यक्ष राजन शिंदे यांनी वरील सर्व गावातील आदिवासी वाड्यांची भागाची पाहणी केली आणि त्या भागातील सर्व युवकांना एकत्र करून या सर्व दुष्काळग्रस्त गावांना स्वखर्चातून मोफत पिण्याच्या पाण्याचे चार टँकर सुरू केले आहे.

सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये या महिलांच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाकडे ना लोकप्रतिनिधी, ना नेते, ना पुढारी कुणाचे ही लक्ष जात नाही. मात्र राजन शिंदे या तरुणाने या महिलांचे पाण्यावाचून होणारे हाल स्वतः समक्ष पाहिले आणि त्यानंतर यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे ही सामाजिक बांधिलकी जपत आपण आपल्या स्वखर्चातून गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे चार टँकर सुरू केले आहे.

- राजन शिंदे,  अध्यक्ष- राजन शिंदे विचार मंच

Post a Comment

Previous Post Next Post