शेतकऱ्याच्या शेतातील मोटर, केबल चोरीला


। श्रीरामपूर । 19 मे 2024 । तालुक्यातील रामपूर येथील वयोवृद्ध शेतकरी एकनाथ लक्ष्मण खेमनर यांच्या शेतातील केबलची चोरी करण्यात आली.

याप्रकरणी खेमनर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माळवाडगावातही चोरी करण्यात आली.

श्रीरामपुर येथील शेतकरी गणपत वामनराव आसने यांच्या शेतातील विहिरीवरील मोटर, सव्वाशे फूट केबल चोरून नेण्यात आली. त्यात आसने यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांनी तालुका पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post