स्वामी विवेकानंद स्कूलची १०० टक्के निकालची परंपरा कायम




। श्रीरामपूर । दि.29 मे 2024 ।  वर्धमान शैक्षणिक व सामाजिक प्रतिष्ठान संचालित स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल वाकडी, गणेशनगर इ. १० वी च्या परिक्षेत १०० टक्के निकालची परंपरा कायम राखली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२४ मध्ये घेतलेल्या इ. १० वी च्या परिक्षेत स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल वाकडी गणेशनगर या विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले. विद्यालयाच्या शंभर टक्के निकाल लागला असून विद्यालयाच्या  स्थापनेपासूनची शंभर टक्के निकालाची परंपरा यावर्षीही कायम राहिली आहे.

विद्यालयात प्रथम क्रमांक रोहन संजय शेळके 94.20 टक्के, द्वितीय क्रमांक गाढवे प्रतीक्षा शिवाजी 92.80 टक्के, तृतीय क्रमांक गोर्डे ओम शिवाजी 92.60 टक्के मिळवत उत्तीर्ण झाले. विद्यालयातील आठ विद्यार्थी 90 टक्के गुण मिळवत उत्तीर्ण झाले. तर अठरा विद्यार्थी 80 टक्केच्या पुढे गुण मिळवत विशेष प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले.

संस्थेचे चेअरमन जयेंद्र काले, संस्थापक बबनराव घोरपडे, संचालिका शोभा घोरपडे, प्राचार्य संभाजी भागडे यांच्यासह सर्व विश्वस्त व शिक्षक, शिक्षकवृंद यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post