बुलढाणा व हिंगोली लोकसभा मतदारसंघाची, संभाजी ब्रिगेडची शिवसेनेकडे मागणी

 बुलढाणा व हिंगोली लोकसभा मतदारसंघाची, संभाजी ब्रिगेडची शिवसेनेकडे मागणी

 प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांची माहिती

। छत्रपती संभाजीनगर । दि.20 मार्च 2024 ।  शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे छत्रपती संभाजीनगर येथे आले असता, बुधवार दि. २० मार्च २०२४ रोजी संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात सविस्तर चर्चा केली. लोकसभेच्या बुलढाणा आणि हिंगोली या दोन मतदारसंघाची मागणी संभाजी ब्रिगेडने वारंवार झालेल्या बैठकीत त्यांच्याकडे केलेली आहे. 

आज त्या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी सकारात्मकता दर्शवली. या विषयावर सकारात्मक चर्चा झाली. त्याचबरोबर लोकसभा निवडणूक पूर्ण महाराष्ट्रभर व देशभर लढवण्यासंदर्भात आणि महाविकास आघाडीचा अर्थात इंडिया आघाडीचा विजय करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

यापुढील रणनीती सर्व एकत्रित येऊन कशाप्रकारे असेल, यावरही सविस्तर चर्चा झाली. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना. अंबादासदादा दानवे माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले यांची उपस्थिती होती.

 तर संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळामध्ये, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष ॲड.मनोजदादा आखरे, महासचिव सौरभदादा खेडेकर मुख्य प्रवक्ते प्रा. गंगाधर बनबरे डॉ.शिवानंद भानुसे हे होते. अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे

Post a Comment

Previous Post Next Post