‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार’ मनपाचे जलअभियंता परिमल निकम यांना प्रदान

 राज्य शासनाचा ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार’ मनपाचे जलअभियंता परिमल निकम यांना प्रदान

। अहमदनगर  । दि.16 मार्च 2024 ।  राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागा अंतर्गत दरवर्षी दिला जाणारा ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार’ मनपाचे जलअभियंता परिमल निकम यांना नुकताच मुंबई येथील शानदार कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, युवक कल्याण व क्रीडा मंत्री संजय बनसोडे व समाज कल्याण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

परिमल निकम यांनी मनपा जलअभियंता म्हणूनही आपल्या कामाने वेगळा ठसा उमटविला आहे. त्याचबरोबर  सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रात अनेक वर्षांपासून सेवाभावी काम करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत यापुर्वीही अनेक संस्थांच्यावतीने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. आताही राज्य शासनाचा पुरस्कार मिळाल्याने त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post