पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ...

पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ आता मिळणार महिन्याला १५ हजार

। मुंबई  । दि.14 मार्च 2024 । पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.  आता पोलीस पाटलांना महिन्याला १५ हजार रुपये मिळतील.

👉 मंदिरातील गर्दीचा फायदा घेऊन महिलेचे सोन्याचे मिनीगंठण पळविले

सध्या पोलीस पाटलांना ६५०० रुपये मिळतात. पोलीस पाटलांचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांमध्ये वाढ झाली असून त्यांना सध्या देण्यात येणारे मानधन कमी असल्याने हा निर्णय घेण्यात आला. सध्या पोलीस पाटलांची ३८ हजार ७२५ पदे असून मानधनात वाढ केल्यास ३९४ कोटी ९९ लाख रुपये वार्षिक खर्च वाढेल.  या खर्चासही मान्यता देण्यात आली.

👉ना.नारायण राणे यांना मराठा तरुणांनी दाखवले काळे झेंडे! 

Post a Comment

Previous Post Next Post