। अहमदनगर । दि.05 ऑगस्ट 2023 । मांजरसुंबा (ता.नगर) येथील गोरक्षनाथ गडावरील मंदिरात दानपेट्या फोडून रोख रक्कम चोरुन नेणार्या चोरट्याला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. आरोपीने गोरक्षनाथ गडावरील तीन दनपेट्या फोडून रोख रक्कम चोरुन नेली होती.
उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना मिळणार शासनाकडून पुरस्कार ...
या गुन्ह्याचा तपास करताना पोलीसांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी एका संशयितास शिताफीने ताब्यात घेतले. त्यास त्यांचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव महेश सुर्यभान पवार (वय 25, रा. पदमपुरवाडी, वाकोडी, ता. नगर) असे सांगितले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
वाळुंज बायपास ते मुट्ठी चौक दरम्यान वाहतुकीच्या मार्गात बदल
त्याचेकडे चोरीच्या गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्याने त्याचे साथीदार संजय गुलाब पवार, अनिकेत सोपान पवार (दोन्ही राहणार पदमपुरवाडी, वाकोडी, ता. नगर) सोनु लहु बर्डे ( राहणार शिराढोण, ता. नगर ) यांनी मिळुन केल्याची कबुली दिली.
शिर्डीतील पिंपळगाव रोड येथील हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उद्ध्वस्त!
