उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना मिळणार शासनाकडून पुरस्कार
सार्वजनिक गणेश मंडळानी 5 सप्टेंबरपूर्वी ऑनलाईन अर्ज करावेत
। अहमदनगर । दि.04 ऑगस्ट 2023 । पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या 4 जुलै 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये 19 सप्टेंबर 2023 पासून सुरू होणाऱ्या सन 2023 च्या गणेशोत्सवात उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्याकरीता स्पर्धा आयोजित करण्याबाबत निर्देश दिले आहेत.
वाळुंज बायपास ते मुट्ठी चौक दरम्यान वाहतुकीच्या मार्गात बदल
त्यानुसार शासन निर्णयात नमूद करण्यात आलेल्या निकषांची पूर्तता करणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांनी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई-मेलवर 5 सप्टेंबर 2023 पूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करावेत.
मराठी साहित्याला मातीचा गंध देणारा ‘रानकवी’ हरपला
अर्जाचा नमुना 4 जुलै, 2023 च्या शासन निर्णयात उपलब्ध असून हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे अपर जिल्हादंडाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी कळविले आहे.
ठाणे येथे राज्यातील पहिले ‘अवयवदान जनजागृती उद्यान’ : मुख्यमंत्री
