शिवसेना-संभाजी ब्रिगेडची पदाधिकारी बैठक ६ ऑगस्ट रोजी मुंबईत होणार
संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांची माहिती
। मुंबई । दि.05 ऑगस्ट 2023 । शिवसेना - संभाजी ब्रिगेडची सयुक्त पदाधिकारी बैठक रविवार ६ ऑगस्ट रोजी रंगशारदा संभागृह बांद्रा मुंबई येथे सायंकाळी ६ ते ९ या वेळेत आयोजित करण्यात आली असल्याचे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविले आहे.
या बैठकीला शिवसेनेचे पक्षप्रमुख मा.उद्धव ठाकरे व संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अड. मनोज आखरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, सुभास देसाई, संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर,यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडचे राज्य पदाधिकारी व जिल्हा प्रमुख जिल्हा सचिव उपस्थित राहणार आहे.
या बैठकीला राज्यभरातून संभाजी ब्रिगेडचे ३०० व शिवसेनेचे ३०० असे ऐकून ६०० पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. या बैठकित आगामी सर्व निवडणूका व शिवसेना व संभाजी ब्रिगेडची पुढील राजकीय दिशा यावर चर्चा होणार असल्याचे डॉ.शिवानंद भानुसे यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
