। नवीदिल्ली । दि.18 जुलै 2023 । काँग्रेसने मोदीच्या विरोधात मोट बांधण्याची सुरवात केली असतानाच आता मोदींनी देखील एनडीच्या घटपक्षांची बैठक घेतली आहे. या बैठकीला महाराष्ट्रामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काही प्रमुख नेते उपस्थित आहे.
दरम्यान, आज दिल्लीतील एनडीएच्य बैठकीसाठी महाराष्ट्रातील काही नेते दिल्लीला रवाना झाले आहेत. यामध्ये विनय कोरेंचा जनसुराज्य पक्ष तसेच बच्चू कडूंना प्रहार संघटना ही देखील सहभागी होत आहेत. बैठकीसाठी बच्चू कडू दिल्लीला रवाना झाले आहेत. तर शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस. तसेच रिपाइं आठवले गट अर्थात केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे देखील बैठकीस हजर राहणार आहे.
दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये एनडीएची बैठक बोलविण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीला दिल्लीतील हॉटेल अशोका येथे सुरुवात झाली आहे. या बैठकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा भाग असलेले देशभरातील 38 पक्षांचे प्रमुख उपस्थित आहेत.
Tags:
Maharashtra
