स्कूल बस चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे : पो.नि.यादव


। अहमदनगर । दि.19 जुलै 2023 ।  कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्व शाळांमध्ये शिकत असलेल्या  लहान विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या स्कूल बसेस आणि रिक्षाचालकांची बैठक काल कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी बोललावली होती. कोणत्याही चिमुकल्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये. यासाठी प्रत्येक चालकाने वाहतुकीच्या नियमांचे तंतोतंत पालन करुन सहकार्य करण्याच आवाहन यावेळी  पोलिस निरिक्षक चंद्रशेखर यादव यांनी स्कूल बसेस व रिक्षा चालकांना केले.

कोतवाली पोलिस ठाणे हद्दीती शालेय विद्यार्थ्यांची शाळेत ने-आण करणार्‍या  स्कूल बस तसेच रिक्षा चालकांची बैठकीत पोलिस निरीक्षक यादव यांनी चाकांना काही सूचना केल्या. वाहन चालविण्याचा परवाना त्यासोबत प्रादेशिक परिवहन विभागाची सर्व कागदपत्रे चालकाकडे असणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.

तसेच, वाहनावर नंबर ल्पेट दोन्ही बाजूने स्पष्ट दिसेल अशा लावाव्यात. वाहनाचा विमा काढलेला असावा. मुलांची ने-आण करताना वाहनात केअर टेकर असावा. चालक हा निर्व्यसनी असावा. तसेच, शाळेतील मुलींची छेडछाड होणार नाही, चाची खबरदारी चालकाने घ्यावी.

सर्व चालकांना सीआरपीसी 149 प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे. यावेळी दिलीप गलांडे, संजय आव्हाड, सलीम शेख, शिवाजी उबाळे, चांद सय्यद, देविदास लोंढे, दिनेश मेहेत्रे, गणेश मोरे, अतिश खामकर, प्रकाश कोटकर, जगन्नाथ बहिरवाडे आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post