। मुंबई । दि.18 जुलै 2023 । बंगळुरमध्ये आज नेत्यांची दुसरी बैठक संपन्न होत आहे. यासाठी आज महाराष्ट्रामधून राष्ट्रवादीचे शरद पवार आणि शिवसेनेचे उध्दव ठाकरे हे उपस्थित आहेत.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील भाजपविरोधी राजकीय पक्ष आज मंगळवारी (दि.१८) बंगळूरमध्ये एकवटले आहेत.
काॅंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होत असून त्यात २६ राजकीय पक्षांचे नेते सहभागी झाले आहेत. यामध्ये राहुल गांधी, महाराष्ट्राचे शरद पवार, शिवसेनेचे उध्दव ठाकरे, दिल्लीचे आपचे नेते अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री, ममता बॅनर्जी आदीसह नेत्यांची बैठक होत आहे.या बैठकीमध्ये किमान समान कार्यक्रमाची आखणी केली जाणार आहे.
शरद
पवार या बैठकीला जानार की नाही अशी चर्चा काल दिवसभर होती. मात्र आज पवार
बंगळूरला उपस्थित आहे. बंगळुरमध्ये ही बैठक आयोजित करण्यात
आली आहे.या बैठकीच्या पार्श्वभूमीवर, उद्धव ठाकरे बंगळूरमध्ये येताच
त्यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतली. यावेळी उभय
नेत्यांत सुमारे वीस मिनिटे चर्चा झाली.
