बिबट्याच्या हल्ल्यात शेळीचा फडशा!


नगर, (दि.26 ऑक्टोबर) : श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव शिवारातील म्हातारपिंप्री येथे राजू बिराजी शिंगटे या मेंढपाळाच्या शेळ्या रानात चरायला गेल्या असता, दुपारी दोनच्या दरम्यान अचानक पाच ते सहा लांडग्याच्या टोळक्याने केलेल्या हल्ल्यात तीन शेळ्या जखमी तर, एक गाभण असलेली शेळीला फाडून खाल्ली आहे.


राजू शिंगटे या मेंढपालाने जिवाच्या आकांताने आरडाओरड करून, कसे बसे इतर शेळ्यांचा जीव वाचवला आहे. या घटनेनंतर आसपासच्या परिसरात शेतकरी व स्थानिकांमध्ये लांडग्यांच्या टोळीची दहशत निर्माण झाली आहे.  यावेळी घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ते व ग्रा. सदस्य राहुल साळवे यांनी स्थानिक वन विभागास याबाबत माहिती दिली.


सदर घटनेचे गांभीर्य ओळखुन, पीडित मेंढपाळास मदत मिळेल, यासाठी सरकारी पशुवैद्यकीय अधिकारी व वन अधिकारी यांच्याशी संपर्क साधून, नमूद घटनेची माहिती देत, पीडित शेतकर्‍याच्या शेळीचा पंचनामा व पोष्टमार्टम व योग्य ती कारवाई करण्यास सांगितले. डॉ. प्रशांत खटके, डॉ. केदार गोलांडे (पशु वैद्यकीय अधिकारी) यांनी याविषयी माहिती घेतली आणि पंचनामा केला आहे. घटनास्थळी वनरक्षक डफडे यांनी भेट दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post