जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकार्‍याच्या नावावर बनावट फेसबूक अकाउंट

। अहमदनगर । दि.13 जुलै 2023 । जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकार्‍याच्या  नावाने फेसबुकवर बनावट अकाउंट तयार करून तयार करून वेगवेगळे मेसेज पाठवले जात आहेत.  त्यामुळे कोणीही फेसबुक अकाउंट वरून आलेल्या मेसेजला प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकार्यांच्या  नावाने फेसबुक बनावट अकाउंट फेसबुक अकाउंट तयार करण्यात आलेले आहे.  या अकाउंट वर अनेकांना मित्र तयार करण्यात आलेले आहे. विशेष करून जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसह जिल्ह्यातील अनेक मान्यवरांना रिक्वेस्ट पाठवण्यात आलेल्या आहेत.

त्या बनावट फेसबुक अकाउंटला अनेकजण फ्रेंड झालेले आहेत. त्यानंतर या बनावट अकाउंट वरून प्रकारचे संदेश पाठवले जात आहे.  अगोदरही असा प्रकार घडलेला आहे. त्याबाबत सायबर सेलला तक्रारही करण्यात आलेली आहे.

यापूर्वीचे फेसबुक अकाउंटबंद करण्यात आलेे आहे. आता पुन्हा फेसबुकला अकाउंट तयार करण्यात आलेले असून त्यावरून वेगवेगळे संदेश पाठवले जात आहे.

कर्मचाऱ्यांसह मान्यवरांनी फेसबुक अकाउंट वरून कोणी मागणी केली तर त्याला प्रतिसाद देऊ नये असे आवाहन संबंधित अधिकार्याच्या यांच्या कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post